पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड येथील महाविद्यालयीन ग्रंथपालांचा स्नेहमेळावा दि.२७ मे २०१३ रोजी उत्साहात संपन्न झाला. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या ''इंटरनेशनल इंस्टिट्यूट ऑफ़ मनेजमेंट सायन्स '' (आय.आय.एम.एस.)
च्या चिंचवड येथील संकुलात हा स्नेहमेळावा आयोजित केला होता. पुणे
विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ.बी. एम. पानगे सर या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रम प्रसंगी डॉ.बी. एम. पानगे सरांचा पुणे विद्यापिठाचे ग्रंथपाल
म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्व ग्रंथपालाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी
आपल्या मनोगतात
त्यांनी '' विद्यार्थ्याचे अभ्यासू विद्यार्थ्यात रूपांतर होत असतांना
तसेच वेगवेगळ्या आधिकार पदांसाठी विद्यार्थ्याचे अद्ययन सुरु
असताना विद्यार्थ्याचे सहायक म्हणून ग्रंथपाल महत्वाची भूमिका निभावत
असतात'' असे सांगुन त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयासाठी ''स्टडी
सर्कल'' सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला. ''ग्रंथपालनाचे कार्य'' या
साधनाचा
प्रभावीपने वापर करण्यासाठी सर्व ग्रंथपालानी आपापसात चर्चा करने, स्वत;चे
प्रश्न मांडने आणि सगळ्याच्या मदतीने उत्तराची वाट शोधण्याचा प्रयत्न
करने यासाठी या प्रकारचा स्नेहमेळावा हा एक उत्तम व्यासपीठ ठरेल असेही
डॉ.पानगे सर यानी सांगीतले.
या कार्यक्रमाला पुणे, पिंपरी-चिंचवड येथील ५0 ते ६0
महाविद्यालयीन ग्रंथपाल उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्री. संदीप गेजगे यानी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे ग्रंथपाल
श्री. पवन शर्मा यानी केले. हा स्नेहमेळा वा नियोजनासाठी विवेक अकोलकर,
नितिन जोशी,जावेद शेख, नितिन नवगिरे,सौ.शकुंतला गुडी,सौ.सुनं दा
फुलारी,बालासाहेब थोरात आदिनी
विशेष परिश्रम घेतले शेवटी आभार प्रदर्शन श्री.राहुल बाराते यानी केले.
या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत उपस्थित ग्रंथपालानी दरवर्षी असा स्नेहमेळावा आयोजित करावा अशा भावना व्यक्त केल्या.
Nitin Joshi
Librarian
No comments:
Post a Comment